Aarti Badade
शाही मटर पनीर ही कांदा, टोमॅटो, काजू आणि दुधाच्या मलाईच्या (किंवा फ्रेश क्रीम) रिच ग्रेव्हीमध्ये बनवली जाणारी एक लज्जतदार आणि लोकप्रिय भाजी आहे.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
२५० ग्रॅम पनीर, १ कप हिरवे मटार, २ कांदे, ३ टोमॅटो, १०-१२ काजू. आले-लसूण पेस्ट, खडे मसाले, कसूरी मेथी, फ्रेश क्रीम, बटर आणि रोजचे सुके मसाले.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काजू मऊ होईपर्यंत परता; मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
एका पॅनमध्ये थोडे बटर किंवा तेल गरम करून त्यात पनीरचे चौकोनी तुकडे हलके सोनेरी रंगावर परतून घ्या, पनीर जास्त कडक करू नका.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
कढईत तेल-बटर गरम करून खडे मसाले आणि आले-लसूण पेस्ट परता, नंतर तयार केलेली काजू-टोमॅटोची पेस्ट घालून मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्या.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
मसाल्यात हळद, तिखट, धने-जिरे पूड घालून मटार व थोडे पाणी टाका आणि मटार मऊ शिजू द्या; नंतर त्यात फ्राय केलेले पनीर, मीठ, थोडी साखर आणि कसूरी मेथी घाला.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
शेवटी भाजीमध्ये अर्धी वाटी फ्रेश क्रीम किंवा मलाई घालून मंद आचेवर २-३ मिनिटे उकळू द्या; गरमागरम शाही मटर पनीर नान, रोटी किंवा जिरा राईससोबत सर्व्ह करा.
Shahi Matar Paneer Recipe
Sakal
Gavran bharleli vangi
Sakal