Saisimran Ghashi
मेथी दाणे जरी चवीला कडू असले तरी मेथी दाण्याचे पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत
मेथी दाण्यांमध्ये नैसर्गिक सॉल्युबल फायबर्स असतात जे कार्बोहायड्रेट्सचे शोषण मंद करतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
मेथीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे सर्दी, खोकला, संसर्ग यांपासून बचाव होतो.
मेथी पाणी पचनक्रिया सुधारते. अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्यांवर मेथी पाणी उपयोगी आहे.
महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, क्रॅम्प्स आणि हार्मोनल असंतुलनावर मेथी पाणी आराम देते.
मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे केस गळती कमी होते आणि त्वचा निरोगी राहते.
मेथी पाणी कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.