Puja Bonkile
पुण्यात शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज हे प्रसिद्ध आहे.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी स्थापन केलेल्या न्यु इंग्लिश स्कूलचे हे मोठे भावंड.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
येथे शिक्षण घेतलेले अनेकजण आयुष्यामध्ये मोठ्या पदावर पोहोचले, नावारूपास आले.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
फर्ग्युसन कॉलेज स्थापन होण्याआधी महाविद्यालयीन शिक्षणासाठी डेक्कन कॉलेज हे एकमेव व पुण्यातील वस्तीपासून दूर असे कॉलेज होते. या दोन्ही संस्थांमध्ये अनेक नामवंतांनी शिकविले.
Deccan College pune
फर्ग्यूसन कॉलेजच्या उद्घाटनाचा समारंभ 2 जानेवारी 1885 रोजी विल्यम वर्डस्वर्थ यांच्या हस्ते पार पडला. ते डेक्कन कॉलेजचे माजी प्राचार्य होते.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
फर्ग्युसन कॉलेज १८९५ पर्यंत शनिवार पेठेत गद्रे वाड्यात भरत असे. जागा कमी पडू लागल्याने चालकांनी तत्कालीन सरकारकडे जागेसाठी विनंती केली, तेव्हा संस्थेस शनिवार वाडा देण्याचे विचाराधीन होते.
Shaniwar Wada
परंतु नंतर बुधवार वाडा म्हणजे सध्याचा फरासखाना ही जागा निश्चित करण्यात आली. त्यानुसार 5 मार्च 1885 रोजी जेम्स फर्ग्युसन यांच्या हस्ते बुधवार वाड्यात कोनशिलाही बसवण्यात आली; परंतु येथे कॉलेज मात्र आकारास आले नाही. १८९१ मध्ये भांबवडे गावात कॉलेजसाठी जागा भाड्याने घेण्यात आली.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
इमारत बाधण्यासाठी रावबहादूर वासुदेव बारुजी कानिटकर यांनी आराखडा तयार केला.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
मुख्य इमारत बांधण्यास ८७,५०० रुपये एवढा खर्च झाला, तर एकूण खर्च १,५५,००० एवढा झाला.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
२७ मार्च १८९५ रोजी फर्ग्युसन कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सँडहर्स्ट यांच्या हस्ते करण्यात आले. तोपर्यंत कॉलेज शनिवार पेठेत गद्रे वाड्यातच भरत होते. आजही देशात व विदेशात या कॉलेजचा मोठा नावलौकिक आहे.
Ferguson College
फर्ग्युसन कॉलेजची मुख्य इमारत टेकडीच्या बाजूने १३५ वर्षापूर्वी कशी दिसत होती हे फोटोमध्ये पाहू शकता.
Ferguson College main building is on the side of the hill
१३५ वर्षापूर्वीच्या फोटोमध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य इमारतीची मागील बाजू स्पष्टपणे दिसत आहे.
Back of the Ferguson College building
फर्ग्युसन कॉलेजची मुख्य इमारत १३५ वर्षापूर्वीच्या फोटोमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता.
The main building of the Ferguson College