Aarti Badade
दिवाळीत मिठाई, चकली, लाडू आणि चिवड्याची मेजवानी असते. मात्र, दूषित किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेले पदार्थ खाल्ल्यास फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.
food Poisoning
बरेच तास उघड्यावर ठेवलेले अन्न, भेसळयुक्त मिठाई, दूषित पाणी आणि खराब झालेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.
food Poisoning
Sakal
पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, पोटात मुरडा येणे आणि ताप ही फूड पॉइझनिंगची सामान्य लक्षणे आहेत. काही वेळा डोकेदुखी आणि अशक्तपणाही जाणवू शकतो.
food Poisoning
Sakal
शिजवलेले अन्न सामान्य तापमानात दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नये. तापमान ३२ अंशांपेक्षा जास्त असल्यास एक तासाच्या आत ते फ्रिजमध्ये ठेवावे.
food Poisoning
Sakal
कच्चे आणि शिजवलेले खाद्यपदार्थ एकाच भांड्यात किंवा एकत्र ठेवू नका. उरलेले अन्न झाकून फ्रिजमध्ये ठेवा आणि पुन्हा खाण्यापूर्वी व्यवस्थित गरम करा.
fridge
स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा. फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा, तसेच स्वयंपाकाची भांडी आणि कापण्याची साधने स्वच्छ ठेवा.
food Poison
उलट्या किंवा जुलाब होत असल्यास शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ आणि ओआरएस घ्या. हलका आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या.
Food poisoning home remedies
Sakal
वारंवार उलट्या होणे, शौचातून रक्त येणे, जास्त ताप येणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
Food poisoning home remedies
Sakal
chanderi fort
Sakal