Aarti Badade
कुठलाही सण असला की गोड पदार्थ बनतो म्हणून ही बासुंदी नक्की बनवा
दूध, साखर, खवा, वेलची पूड, केशर, काजू, बदाम, पिस्ता, चारोळ्या
जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा आणि सतत हलवत राहा.
थोडं दूध आटल्यावर खवा वेगळ्या वाटीत पातळ करून दुधात मिसळा.
खवा घातल्याने दूध पटकन घट्ट होते आणि बासुंदीला खास चव येते.
आता त्यात साखर व केशर काड्या टाका आणि 7-8 मिनिटे उकळा.
वेलची पूड मिसळा आणि गॅस बंद करा.
काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळ्या बारीक चिरून घाला.
बासुंदी थंड झाल्यावर घट्ट होते. गरम किंवा थंड – दोन्ही प्रकारे सर्व्ह करा!