Aarti Badade
केळीच्या पानं आणि सालींमध्येही आरोग्यवर्धक गुणधर्म दडलेले आहेत.
केळीच्या सालींमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि पेशींचं नुकसान टाळतात.
साली आणि पानांमधील पॉलीफेनॉल व फायटोकेमिकल्स दाह कमी करून संधिवातासारख्या आजारांत मदत करतात.
सालींमधील व्हिटॅमिन बी६, बी१२, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम त्वचा सुधारतात, मुरुम कमी करतात आणि ग्लो देतात.
सालींमधील आहारातील फायबर पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक घटक असतात, जे बॅक्टेरिया व बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करतात.
पाने आणि साली जैवविघटनशील असल्याने प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय ठरतात.
सालींमधील अँटीमायक्रोबियल गुणधर्म प्लेक कमी करून तोंड स्वच्छ ठेवतात.
पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व अ, ब आणि क यांचा उत्तम स्रोत; हृदय व स्नायूंसाठी फायदेशीर.
केळीचं झाड संपूर्ण उपयोगी – फळ, पाने आणि साली शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी वरदान!