Pranali Kodre
जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला ओळखले जाते. याच खेळाचा वर्ल्ड कप दर चार वर्षांनी होतो.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
यंदा २०२६ मध्ये फुटबॉलचा २३ वा वर्ल्ड कप ११ जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे खेळवला जाणार आहे.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
यंदाचा फिफा वर्ल्ड कप सर्वात मोठा देखील आहे, कारण या स्पर्धेत तब्बल ४८ संघ सहभागी होणार आहेत.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
११ जून ते १९ जुलै असा ३९ दिवस चालणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये १०४ सामने खेळले जाणार आहेत.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
फिफा वर्ल्ड कपमधील सामने भारतात दिसणार की नाही, याबाबत बरेच दिवस संभ्रम होता. मात्र आता भारतातील सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेडने यांनी हक्क विकत घेतलेत.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
त्यामुळे युनाईट८ स्पोर्ट्सच्या टीव्ही चॅनेलवर आणि Zee5 वर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही फिफा वर्ल्ड कपचे सामने पाहाता येणार आहेत. पण यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
तसेच डीडी फ्री डिशवरील डीडी स्पोर्ट्सवर पहिला सामना, उपांत्यपूर्व सामने, उपांत्य सामने आणि अंतिम सामना मोफत पाहाता येईल.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
भारतात रात्री १२ नंतर सामने सुरू होणार आहेत. पण काही मोजकेच सामने आहेत, जे १२ च्या आधी सुरू होतील. साधारण भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० पर्यंत सामने होतील.
FIFA World Cup 2026 India Live Streaming
Sakal
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal