जेवणातलं तेल Filtered की Refined? दोन्हीत फरक काय?

सकाळ डिजिटल टीम

रिफाइन्ड आणि फिल्डर

स्वंयपाक घरात वापरलं जाणारं तेल बाजारातून खरेदी करताना त्यावर रिफाइन्ड किंवा फिल्टर्ड असं अनेकदा वाचलं असेल. त्याचा अर्थ आणि फरक आपण जाणून घेऊ.

Filtered and refined oil

|

Esakal

फिल्टर ऑइल

फक्त गाळण्याची प्रक्रिया केलेल्या तेलाचा नैसर्गिक रंग, सुगंध आणि चव कायम राहते. कमीत कमी प्रक्रिया केलेलं तेल म्हणजे फिल्टर तेल.

Filtered and refined oil

|

Esakal

रिफाइन्ड

तेलावर अनेक प्रक्रिया केल्या जातात, रंग अधिक स्वच्छ करतात. उग्र वास कमी केला जातो आणि शेल्फ लाइफ वाढवली जाते

Filtered and refined oil

|

Esakal

दोन्हीत फरक काय?

फिल्टर तेल फक्त गाळलं जातं. तर रिफाइन्ड तेलावर अनेक रासायनिक प्रक्रिया होतात. रिफाइन्ड तेल दिसायला स्वच्छ आणि हलकं असतं.

Filtered and refined oil

|

Esakal

तेलाचे प्रकार

शेंगदाणा तेल आणि मोहरी (Mustard) तेल हे फिल्टर असतात. तर सोयाबीन, राइस ब्रॅन, सूर्यफूल तेल रिफाइन्ड असतं.

Filtered and refined oil

|

Esakal

किंमत

कमी प्रक्रिया आणि नैसर्गिक गुणधर्म टिकून राहत असल्यानं फिल्टर ऑइलची किंमत जास्त असते. याचं उत्पादनही रिफाइन्ड तेलाच्या तुलनेनं कमी असतं.

Filtered and refined oil

|

Esakal

पॅकेटवर कसं ओळखायचं?

तेल खरेदी करताना फक्त कंपनीचं नाव, किंमत, ऑफर बघू नका. पॅकेटवर Filtered Oil किंवा Refined Oil असा उल्लेख असतो तोसुद्धा बघा.

Filtered and refined oil

|

Esakal

कोणतं वापरायचं?

नैसर्गिक चव आणि पारंपरिक प्रक्रिया महत्त्वाची वाटत असेल तर फिल्टर तेल वापरण्यास चांगले तर जास्त शेल्फ लाइफ आणि हलका रंग यासाठी रिफाइन्ड तेल निवडू शकता.

Filtered and refined oil

|

Esakal

अकबर-बीरबल मैत्री कशी झाली? महेश दास बीरबल कसा बनला?

Akbar Birbal

|

Esakal

इथं क्लिक करा