सकाळ डिजिटल टीम
तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी योग्य रंग निवडणं महत्त्वाचं आहे!
हॉट न्यूड्स, हॉट पिंक, पीच आणि बेबी पिंक हे शेड्स उजळ त्वचेला नाजूकतेने शोभून दिसतात.
रासबेरी आणि पिंकचे इतर लाईट टोन तुमच्या चेहऱ्याला फ्रेश आणि लुकला सॉफ्ट बनवतात.
कोरल, मॉव्ह, मट शेड्स आणि ब्राउनिश पिंकचे टोन मध्यम त्वचेवर खूप छान दिसतात.
मध्यम त्वचेवर क्लासिक रेड किंवा डीप रेड लिपस्टिक जबरदस्त उठून दिसते!
वाईन, मरून, प्लम, ब्राउन आणि डीप बेरी हे रंग डार्क स्किन टोनवर उठून दिसतात आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणतात.
डार्क स्किन टोनवर हे शेड्स अधिक उठावदार दिसतात आणि तुमचा संपूर्ण लुक आकर्षक बनवतात.
न्यूड शेड निवडताना तुमच्या त्वचेच्या अंडरटोनशी जुळणारी शेड निवडा, नाहीतर ती फिकट वाटू शकते.
तुम्हाला तुमच्या स्किन टोनची जाणीव असली की योग्य शेड्सची निवड करणं खूप सोपं होतं. वेगवेगळ्या रंगांसोबत प्रयोग करायला विसरू नका!