सूरज यादव
फिनलँड सलग नवव्या वर्षी जगातला सर्वात आनंदी देश ठरला आहे. चांगलं जीवनमान, सामाजिक सुरक्षेसह अनेक कारणं यामागे आहेत.
Finland Worlds Happiest Country
फिनलँडमध्ये गुन्हेगारी दर अत्यंत कमी आहे. यामुळे लोकांचा पोलीस आणि सरकारी यंत्रणांवर विश्वास आहे. परिणामी जनतेमध्ये सुरक्षेची भावना आहे.
Finland Worlds Happiest Country
शिक्षण आणि आरोग्य सुविधा देशात जवळपास मोफत पुरवल्या जातात. शिवाय ज्या सुविधांसाठी पैसे मोजावे लागतात त्या स्वस्त आहेत.
Finland Worlds Happiest Country
सरकारकडून नागरिकांच्या समस्यांचे निराकारण केले जाते. बेरोजगारीवर उपाय, आरोग्याच्या समस्या असलेल्यांना आधार दिला जातो.
Finland Worlds Happiest Country
फिनलँडमध्ये वर्क लाइफ बॅलन्सवर जास्त भर देण्यात येतो. कामाचे तास मर्यादीत असतात आणि कौटुंबिक जीवनाला जास्त महत्व देण्यात येतं.
Finland Worlds Happiest Country
फिनलँडला निसर्गाची देणगी लाभलीय. यामुळे स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि विपुल वनसंपदा यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहते.
Finland Worlds Happiest Country
स्त्री-पुरुष समानता किंवा जाती भेद यासारख्या भेदभावाला देशात थारा नाही. समाजातील सर्व घटकांना समान संधी दिली जाते.
Finland Worlds Happiest Country
फिनलँडची संस्कृती असलेली सिसु नावाची संकल्पनाही त्यांच्या आनंदाचे कारण आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची त्यांची वृत्ती आहे.
Finland Worlds Happiest Country
LPG odorless
ESakal