IPL इतिहासातील पहिला-वहिला सामना आठवतोय का?

प्रणाली कोद्रे

17 वा हंगाम

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेचा सध्या 17 वा हंगाम सुरू आहे. पण या आयपीएलची सुरुवात कधी झाली माहित आहे का?

IPL Captains | X/IPL

तारीख अन् ठिकाण

तर, आयपीएलच्या इतिहासातील पहिला सामना झाला होता १८ एप्रिल २००८ रोजी बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियवर.

Virat Kohli | IPL 2008 | X/RCBTweets

संघ

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने आले होते.

Ricky Ponting | IPL 2008 | X/KKRiders

कर्णधार

कोलकाता संघाचा त्यावेळी कर्णधार होता सौरव गांगुली, तर बेंगळुरूचा कर्णधार होता राहुल द्रविड.

Sourav Ganguly | IPL | X/KKRiders

टॉस

त्या सामन्यात द्रविडने टॉस जिंकला आणि पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Rahul Dravid | IPL 2008 | X/RCBTweets

मॅक्युलमचे वादळ

मात्र, त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताकडून ब्रेंडन मॅक्युलमचे वादळ आले. सलामीला उतरलेल्या मॅक्युलमने 73 चेंडूत 10 चौकार आणि 13 षटकारांचा पाऊस पाडत 158 धावा चोपल्या.

Brendon McCullum | IPL 2008 | X/KKRiders

पहिल्याच सामन्यात 200 पार

त्यामुळे कोलकाताने 20 षटकात 3 बाद 222 धावा केल्या होत्या. बेंगळुरूकडून गोलंदाजीत झहिर खान, ऍश्ली नोफके आणि जॅक कॅलिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

Brendon McCullum | IPL 2008 | X/KKRiders

बेंगळुरूचा पराभव

त्यानंतर 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूचा संघ 15.1 षटकातच 82 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना कोलकाताने तब्बल 140 धावांनी जिंकला.

RCB | IPL 2008 | X/RCBTweets

अगरकरच्या 3 विकेट्स

बेंगळुरूकडून फक्त प्रविण कुमारने (18) 10 धावांचा टप्पा पार केला. कोलकाताकडून अजित अगरकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Ajit Agarkar | IPL 2008 | X/KKRiders

धवन लेकाच्या आठवणीत भावूक, घातली त्याच्या नावाची जर्सी

Shikhar Dhawan Son | Instagram