धवन लेकाच्या आठवणीत भावूक, घातली त्याच्या नावाची जर्सी

प्रणाली कोद्रे

चर्चा

भारताचा सलामीवीर आणि पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन गेल्या काही महिन्यात कौटुंबिक कलहामुळे अनेकदा चर्चेत येत आहे.

Shikhar Dhawan | X/IPL

लेकासाठी पोस्ट

आता त्याने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्याने त्याचा मुलगा झोरावरसाठी केली आहे.

Shikhar Dhawan Son | Instagram

लेकाच्या नावाची जर्सी

शिखरने केलेल्या पोस्टमध्ये दिसते की पंजाब किंग्सच्या जर्सीवर त्याचा मुलगा झोरावरचे नाव लिहिलेले असून ती जर्सी त्याने परिधान केली आहे. तसेच या जर्सीवर 1 क्रमांकही लिहिलेला आहे.

Shikhar Dhawan | Instagram

कॅप्शन

या पोस्टला त्याने कॅप्शन दिले आहे की, 'तू नेहमीच माझ्या बरोबर असशील, माझ्या मुला.'

Shikhar Dhawan Post | Instagram

मुलाशी संपर्क नाही

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शिखर अनेक महिन्यांपासून त्याच्या मुलाला भेटलेला किंवा बोललेलाही नाही.

Shikhar Dhawan | Instagram

घटस्फोट

कारण त्याचा त्याची पत्नी आयेशा मुखर्जीबरोबर 2021 मध्ये घटस्फोट झाला असून झोरावर आयेशाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. तसेच शिखरने आरोप केला होता की ती त्याला झोरावरशी संपर्क ठेवू देत नाही.

Shikhar Dhawan

दुखापत

धवन सध्या आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स संघाचा कर्णधार आहे. परंतु, त्याला काही दिवस सामन्यांना मुकावे लागणार आहे, कारण त्याला खांद्याची दुखापत झालेली आहे.

Shikhar Dhawan | X/IPL

IPL मध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कोणी केलाय?

Rajasthan Royals | Sakal