सकाळ डिजिटल टीम
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिलं भव्य मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारलं आहे.
शिवजयंतीनिमित्त 17 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीचे साकारणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवली आहे.
शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट उंचीची, अखंड कृष्णशिला पाषाणातून घडवली आहे.
मंदिर परिसरात 36 शिल्पचित्रांद्वारे शिवाजी महाराजांच्या शौर्य प्रसंगांची साक्ष देणारी चित्रे उभारली गेली आहेत.
हे मंदिर शिवप्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थळ बनणार असून, येथील वातावरण शिवमय झालं आहे.
सात वर्षांच्या प्रयत्नांनी मंदिराची उभारणी पूर्ण झाली असून शिल्पचित्रांखाली महाराजांच्या जीवनावरील माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दिली आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी मंदिर उभारण्यामागील प्रेरणा दिली आहे.