सूरज यादव
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत आहे. आंबेडकरांनी त्यांच्या वकिलीची सुरुवात नाशिकमधून केली होती.
dr babasaheb ambedkar
Esakal
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनच्या ग्रेज इन इथं बॅरिस्टर अॅट लॉ पदवी घेतली. त्यानंतर वर्षभराने ते मुंबईत आले आणि त्यांना हायकोर्टाची सनद मिळाली.
dr babasaheb ambedkar
Esakal
लंडनमध्ये बॅरिस्टर होऊन परतल्यानंतर १९२३ला त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. पण सुरुवातीला त्यांना कुणी केसच देत नव्हतं.
dr babasaheb ambedkar
Esakal
वकिली सुरु करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना केसेस मिळत नव्हत्या. नाशिकच्या आडगावमधील एका जमिनीच्या वादाची केस त्यांना मिळाली होती.
dr babasaheb ambedkar
Esakal
बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असल्यानं त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. अनेक वकिलांनी त्यांना मदत करणं टाळलं तेव्हा बाळकृष्ण मोडक या वकिलाने सहकार्य केलं.
dr babasaheb ambedkar
Esakal
आडगावातील पुंजाजी नवासाजी जाधव यांच्या जमिनीची केस आंबेडकरांनी लढवली होती. जेव्हा ते नाशिकला जायचे तेव्हा आडगावात जाधव यांच्या घरी जात असत.
dr babasaheb ambedkar
Esakal
बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही पहिली केस वर्षभर चालली होती आणि ती जिंकलीसुद्धा होती. या केसची फी म्हणून त्यांना ६०० रुपये मिळाले होते.
dr babasaheb ambedkar
Esakal
वकील म्हणून कामाला सुरुवात केली तरी तेवढ्या कमाईतून घरखर्च चालत नसल्यानं पुढे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केलं.
dr babasaheb ambedkar
Esakal
Babasaheb Ambedkar childhood Satara home
Sakal