सूरज यादव
मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतात एलपीजी तुटवड्याचं संकट निर्माण झालंय. यामुळे सामान्य लोकांसह लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.
LPG Gas
Esakal
भारतात पहिलं अधिकृत एलपीजी कनेक्शन इंडेन ब्रँड अंतर्गत देण्यात आलं होतं. २२ ऑक्टोबर १९६५ ला पहिलं कनेक्शन दिल्यानंतरच देशभरात एलपीजी वितरणाला सुरुवात झाली.
LPG Gas
Esakal
एलपीजी कनेक्शनची पहिली बॅच पश्चिम बंगालमधील कोलकात्यात वितरीत करण्यात आली होती. त्यानंतर इतर शहरांमध्ये हळू हळू वितरण प्रणालीचा विस्तार करण्यात आला.
LPG Gas
Esakal
एलपीजी सिलिंडर वितरणाच्या पहिल्या टप्प्यात कोलकाता आणि पटनामधील जवळपास २ हजार ग्राहकांचा समावेश होता. तेच सुरुवातीचे वापरकर्ते होते.
LPG Gas
Esakal
१९६५ मध्ये एका एलपीजी सिलिंडरची किंमत ३ रुपये ५० पैसे ते ४ रुपयांपर्यंत होती. आज त्याच्या तुलनेत शेकडो पटींनी वाढ झाली आहे.
LPG Gas
Esakal
सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीला अनेक लोक एलपीजी सिलिंडर वापरण्यास घाबरत होते. स्वयंपाक घरात एलीपीजी सिलिंडर ठेवणंही धोक्याचं होतं.
LPG Gas
Esakal
काही हजार सिलिंडरपासून सुरू झालेली ही वितरण प्रणाली आता जगातील सर्वात मोठ्या इंधन वितरण प्रणालीपैकी एक बनलीय.
LPG Gas
Esakal
petrol diesel price
ESakal