सकाळ डिजिटल टीम
चप्पलचा शोध कोणी आणि कसा लावला काय आहे या मागचा इतिहास जाणून घ्या.
ओरेगॉन, अमेरिकामधील फोर्ट रॉक गुहेत, सुमारे 10,000 वर्षांपूर्वीची (इ.स.पू. 8,000) पादत्राणे सापडली आहेत. ती सेजब्रश नावाच्या वनस्पतीपासून बनवलेली होती. असे सांगण्यात येते.
इजिप्तमध्ये सापडलेली सर्वात जुनी चप्पल सुमारे 5,000 वर्षांपूर्वीची आहे (इ.स.पू. 3,000). ती पपायरस आणि ताग यांसारख्या वनस्पतींच्या तंतूंपासून बनवलेली होती.
प्राचीन ग्रीस आणि रोमन साम्राज्यात चप्पलचे अनेक प्रकार विकसित झाले. ग्रीकांनी चप्पलला सामाजिक दर्जाचे प्रतीक मानले.
चप्पलचा शोध हा एका क्षणात किंवा एका व्यक्तीने लावलेला नाही, तर मानवी गरजांनुसार त्याचा हळूहळू विकास झाला.
सुरुवातीला चपलांचे दोन मुख्य प्रकार होते: सँडल (पायाला दोरीने बांधलेली) आणि मोकासिन (संपूर्ण पायाला झाकणारे चामड्याचे पादत्राण).
इजिप्तमध्ये फक्त उच्च-वर्गीय लोक चप्पल वापरत असत, तर ग्रीसमध्ये ती सर्वसामान्यांसाठी होती. चप्पलमुळे व्यक्तीचा सामाजिक दर्जा आणि व्यवसाय ओळखला जात असे.
औद्योगिक क्रांतीनंतर चप्पल बनवण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल झाले. रबर, प्लास्टिक आणि विविध कृत्रिम वस्तूंचा वापर सुरू झाला, ज्यामुळे चप्पल स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली.
आज चप्पल हे केवळ संरक्षणाचे साधन नसून फॅशनचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे, ज्याचे अनेक प्रकार आणि डिझाइन्स उपलब्ध आहेत.