जगातील पहिले जहाज कोणी बनवले? हजारो वर्षांपूर्वीची रोचक कथा

सकाळ डिजिटल टीम

पहिले जहाज

जगातील पहिले जहाज कोणी बनवले? या मागचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

First Ship in the World

|

sakal

ओंडक्याचा तराफा

सुरुवातीला मानवाने केवळ लाकडी ओंडक्यांचा वापर करून नदी पार केली. अनेक ओंडके एकमेकांना वेलींनी बांधून 'तराफा' तयार करणे, हीच जहाजाची सर्वात प्राथमिक आवृत्ती होती.

First Ship in the World

|

sakal

डगआउट कॅनो

सुमारे ७,००० ते १०,००० वर्षांपूर्वी मानवाने झाडाची मोठी खोडे पोखरून त्यात बसण्यासारखी जागा तयार केली. नेदरलँड्समध्ये सापडलेली 'पेसे कॅनो' ही जगातील सर्वात जुनी नौका मानली जाते (इसवी सन पूर्व ७६००).

First Ship in the World

|

sakal 

प्राचीन इजिप्तचे योगदान

इसवी सन पूर्व ३००० च्या सुमारास इजिप्शियन लोकांनी 'पपायरस' वनस्पतीच्या काड्यांपासून जहाजे बनवली. नाईल नदीतून जड दगडांची वाहतूक करण्यासाठी त्यांनी पुढे लाकडी फळ्यांना दोरीने बांधून मजबूत जहाजे तयार केली.

First Ship in the World

|

sakal

फिनिशियन खलाशी

लेबनॉनमधील फिनिशियन लोक जगातील पहिले महान 'सागरी इंजिनिअर्स' मानले जातात. त्यांनी जहाजांना 'कील' (Keel) म्हणजे खालचा आधार दिला, ज्यामुळे जहाजे समुद्रातील लाटांवर स्थिर राहू लागली.

First Ship in the World

|

sakal

दोरीने बांधलेली जहाजे

प्राचीन काळात खिळे उपलब्ध नव्हते. त्यामुळे लाकडी फळ्यांना छिद्रे पाडून त्यात नारळाच्या किंवा तागाच्या दोऱ्या ओवून जहाजे विणली जात असत. या तंत्राला 'Sewn Boats' असे म्हणतात.

First Ship in the World

|

sakal

चिनी 'जंक' जहाजे

चीनने इसवी सन २ व्या शतकात 'जंक' (Junk) प्रकारची जहाजे विकसित केली. त्यांनी जहाजांमध्ये अनेक कप्पे (Watertight compartments) बनवले, ज्यामुळे जहाजाला छिद्र पडले तरी ते बुडत नसे.

First Ship in the World

|

sakal

होकायंत्राचा वापर

१२ व्या शतकापर्यंत जहाजे फक्त किनारपट्टीने प्रवास करत. मात्र, होकायंत्राच्या (Compass) शोधानंतर मानवाने भर समुद्रात दिशा शोधत लांब पल्ल्याचे प्रवास (उदा. कोलंबस, वास्को-द-गामा) सुरू केले.

First Ship in the World

|

sakal

लोखंडी आणि वाफेची जहाजे

१८ व्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर लाकडाची जागा लोखंड आणि स्टीलने घेतली. रॉबर्ट फुलटनने १८०७ मध्ये पहिले यशस्वी वाफेचे जहाज (Steamboat) बनवले, ज्यामुळे जहाजे वाऱ्यावर अवलंबून राहणे थांबले.

First Ship in the World

|

sakal

खार्ग बेट इतकं महत्त्वाचं का? अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणसह जगाचंही टेन्शन वाढलं

kharg island

|

Esakal

येथे क्लिक करा