सूरज यादव
अमेरिकेनं आता इराणच्या खार्ग बेटावर हल्ला केला आहे. पर्शियन आखातात असलेलं हे बेट जगाच्या नकाशा शोधणंही कठीण जावं इतकं लहान आहे.
kharg island
Esakal
खार्ग बेट आकाराने लहान असलं तरी जागतिक राजकारण, एनर्जी मार्केट आणि लष्करी रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. खार्ग बेट हे फक्त २० चौरस किमी इतकंच आहे. त्याची लांबी ७ किमी तर रुंदी फक्त ३ किमी इतकी आहे.
kharg island
Esakal
अमेरिकन लष्कराने खार्ग बेटावर मोठा हल्ला केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बॉम्बहल्ल्यापैकी हा एक हल्ला होता असंही ते म्हणालेत.
kharg island
Esakal
इराणच्या बुशेहर किनारपट्टीपासून २५ किमी समुद्रात असलेल्या या बेटावर ३ ते ५ हजार लोक राहतात. यात स्थानिक मच्छिमार, इराणच्या राष्ट्रीय तेल कंपनीचे कर्मचारी आणि लष्कराचे सैनिक यांचा समावेश आहे.
kharg island
Esakal
चुन्याच्या खडकापासून तयार झालेलं हे नैसर्गिक बेट असून इराणसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे. या बेटाच्या शेजारी खोल समुद्र असल्यानं जगातील मोठे तेल टँकर सहज पोहोचू शकतात.
kharg island
Esakal
खार्ग बेटाला इराणचं सर्वात मोठं तेल टर्मिनल म्हटलं जातं. समुद्राखालून टाकलेल्या पाईपलाईनद्वारे मोठ्या तेल क्षेत्रांशी हे बेट जोडलेलं आहे.
kharg island
Esakal
तेल निर्यातीतून मोठी इराणमधील एकूण तेल निर्यातीच्या ९० टक्के निर्यात ही खार्ग बेटावरूनच होते. आंतरराष्ट्रीय दरानुसार दरवर्षी या बेटामुळे ४० ते ६० अब्ज डॉलर इतकी कमाई होते.
kharg island
Esakal
खार्ग बेटावरून तेल निर्यात थांबली तर इराणच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल. याशिवाय जगाच्या चिंतेतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
kharg island
Esakal
खार्ग बेटातून होणारी तेल निर्यात ही जगभरात होणाऱ्या तेल पुरवठ्याच्या २ ते ३ टक्के इतकी आहे. त्यामुळे इथून तेल वाहतूक थांबली तर इंधन तेलाच्या किंमती वाढू शकतात.
kharg island
Esakal
ट्रम्प यांनी १९८८ मध्ये एका मुलाखतीत म्हटलं होतं की, अमेरिकन जहाजांवर इराणने हल्ला केला तर खार्ग बेटांवर ताबा मिळवला पाहिजे.
kharg island
Esakal
LPG production
ESakal