पुजा बोनकिले
यंदा गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
तुम्ही यंदा पहिल्यांदाच बाप्पाला घरी आणत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
ज्या गणेशाची मूर्ती डाव्या बाजूला आहे ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते.
जर बाप्पा पहिल्यांदाच तुमच्या घरी येत असेल तर त्यांची बसलेली मूर्ती घरी आणा. यामुळे घरात नेहमीच सुख आणि समृद्धी राहते.
यासोबतच, गणपतीचा हातही आशीर्वादाच्या स्थितीत असावा आणि दुसऱ्या हातात मोदक असावा. अशी मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते.
गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी आणि बाप्पा अशा प्रकारे बसवावेत की त्यांचे तोंड उत्तरेकडे असेल.
बाप्पाची स्थापना करण्यापूर्वी लाकडी स्टँड पूर्णपणे स्वच्छ करा आणि गंगाजळाने ते शुद्ध करा आणि नंतर त्यावर लाल कापड पसरवून त्यावर बाप्पा ठेवा.