पुजा बोनकिले
भावा-बहिणीचं नातं अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय.
यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
या दिवशी भावाला ओवाळतांना बहिणीच्या ओवाळणीच्या ताटात राखीसह कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या कपाळावर टिळा लावण्यासाठी ओवाळणीच्या ताटात कुंकु आणि त्यावर लावण्यासाठी तांदुळ म्हणजे अक्षता असल्या पाहिजे.
तेलाचा किंवा तुपाचा छोटा दिवा ओवाळणीच्या ताटात ठेवा.
ओवाळणीच्या ताटात सुपारी किंवा सोन्याची अगंठी ठेवावी.
भावाला ओवळून झाल्यावर मिठाई द्यावी. लाडू, पेढे किंवा कोणताही गोड पदार्थ ताटात ठेऊ शकता. कारण सण गोडवा असावा.
ओवाळणीच्या ताटात नारळ म्हणजेच श्रीफळ देखील ठेवावे.