ज्येष्ठ नागरिकांनी जिम सुरू केलं तर..?

सकाळ डिजिटल टीम

शारीरिक ताकद

वय वाढत असताना स्नायूंची ताकद घटते. जिममध्ये वेट ट्रेनिंगमुळे स्नायू आणि मसल्स मजबूत राहतात आणि शरीर सशक्त बनते.

Physical Strength | Sakal

हाडे मजबूत

नियमित व्यायामामुळे 'ऑस्टिओपोरोसिस' होण्याचा धोका कमी होतो. वेट ट्रेनिंग हाडे मजबूत करते आणि फ्रॅक्चरपासून संरक्षण देते.

Stronger Bones | Sakal

शरीराचा तोल

शरीराचा समतोल राखण्यासाठी मसल्सची ताकद, जॉइंट्सची हालचाल आणि बॅलन्सिंग व्यायाम आवश्यक असतो, जो जिममध्ये सहज शक्य होतो.

Better Balance | Sakal

हृदयाचे आरोग्य

कार्डिओ वर्कआउट्स आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय विकारांचा धोका कमी होतो.

Heart Health | Sakal

मधुमेह व कोलेस्टेरॉल

व्यायामामुळे चयापचय वाढतो आणि 'इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी' सुधारते. त्यामुळे औषधांची गरज कमी होऊ शकते.

Diabetes & Cholesterol Control | Sakal

मानसिक आरोग्य

जिममध्ये व्यायाम केल्याने 'एंडोर्फिन' तयार होतात, जे नैराश्य, चिंता, आणि तणाव दूर करण्यात मदत करतात. आत्मविश्वासही वाढतो.

Mental Well-being | Sakal

ऊर्जा आणि उत्साह

नियमित व्यायामामुळे शरीर थकते नाही आणि दिवसभर उत्साही वाटते. यामुळे झोपही सुधारते आणि आरोग्य टिकते.

More Energy & Enthusiasm | Sakal

सामाजिक संपर्क

ज्येष्ठ नागरिकांसाठी जिम हे केवळ व्यायामाचेच नाही तर नवीन मैत्री निर्माण करण्याचे माध्यमही ठरते. एकत्र व्यायाम केल्याने प्रेरणा वाढते.

Social Interaction | Sakal

जास्त आयुष्यमान

वयस्कर व्यक्तींनी जिममध्ये नियमित व्यायाम केल्यास जीवनमान आणि आयुष्याची गुणवत्ता वाढते. तीन ते पाच वर्षे अधिक जगण्याची शक्यता संशोधनातून दिसून आली आहे.

Longer, Healthier Life | Sakal

पावसाळ्यातली कडाडणारी वीज कशी निर्माण होते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

lightning | sakal
येथे क्लिक करा