सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात अनेक वेळा वीजांचा कडकडात होत असतो.
ही वीज तयार कशी होते तुम्हाला माहीत आहे का?
वीज नक्की कशी तयार होते काय आहे या मागचे वैज्ञानिक कारण जाणून घ्या.
ढगांमध्ये पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे घर्षण होते. या घर्षणातून विद्युत प्रभार निर्माण होतो.
ढगाच्या वरच्या भागात सकारात्मक (positive) प्रभार आणि खालच्या भागात नकारात्मक (negative) प्रभार जमा होतो.
जेव्हा प्रभारामधील फरक खूप मोठा होतो, तेव्हा हवा इन्सुलेटर म्हणून काम करणे थांबवते आणि वीज मोठ्या प्रमाणात बाहेर पडते.
वीज बाहेर पडताना हवा खूप वेगाने गरम होते आणि थंड होते. या जलद विस्तार आणि आकुंचनामुळे ध्वनी लहरी निर्माण होतात, ज्या आपल्याला मेघगर्जना म्हणून ऐकू येतात.
वीज प्रामुख्याने जमिनीवर पडते कारण जमिनीवर जास्त विद्युत प्रभार असतो आणि त्यामुळे वीज जमिनीकडे आकर्षित होते.
विजा नैसर्गिक प्रक्रिया आहेत आणि त्या ढगांच्या विद्युत प्रभारामुळे होतात.