Aarti Badade
आहारातून काही पदार्थ पूर्णपणे काढून टाकल्यास नंतर त्यांची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही अति खाण्याकडे वळू शकता.
फक्त कार्डिओ किंवा HIIT व्यायामावर अवलंबून राहिल्यास शरीरातील चरबी कमी होणार नाही, त्यामुळे स्नायू मजबूत करणारे व्यायामही आवश्यक आहेत.
परिपूर्ण वेळेची वाट पाहत राहिल्यास तुम्ही सुरुवातच करू शकणार नाही, त्यामुळे वजन कमी करायचं असल्यास लगेच सुरुवात करा.
एकट्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे मित्र, प्रशिक्षक किंवा कुटुंबीयांचा पाठिंबा घेणे फायदेशीर ठरते.
फक्त हेल्दी अन्न खाल्ल्याने वजन कमी होत नाही, त्यासाठी संतुलित आहार आणि योग्य योजना आवश्यक असते.
डाएट करताना प्रोटीन, फायबर आणि योग्य कॅलोरीचे प्रमाण लक्षात न घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही.
खूप कमी खाणे किंवा उपाशी राहणे शरीराची कार्यक्षमता कमी करू शकते, त्यामुळे शास्त्रशुद्ध डाएट प्लॅन आवश्यक आहे.