Saisimran Ghashi
तीळ हे अत्यंत पौष्टिक असते आणि त्यात विविध जीवनसत्त्वं, खनिजे आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात.
रोज चमचाभर तीळ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.
तीळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडांची मजबूती वाढवते आणि हाडांचे आरोग्य सुधारते.
तीळांमध्ये जस्त (zinc) आणि सेलेनियम असतात, जे पिंपल, काळे डाग दूर करून त्वचेला तरुण ठेवतात.
तीळांमध्ये हायड्रोजन फॅटी अॅसिड्स नाहीत, त्यामुळे तीळ तेल हृदयासाठी फायदेशीर ठरते. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते.
तीळांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरतात. तीळ खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम मिळतो आणि हायड्रेशनसाठी मदत होते.
तीळांमध्ये प्रथिने आणि ऊर्जा देणारे घटक असतात, जे तुमच्या थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.