जवस खाणे आरोग्यदायी, पण कसेही अन् कितीही खाऊ नका...

Aarti Badade

जवस

जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे प्रमाण आणि वापर चुकीचा असला तरी नुकसान होऊ शकते.

flax seeds | Sakal

जवसाचे आरोग्यदायी गुण

जवसामध्ये जीवनसत्त्वं, खनिजं आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात. शरीरासाठी आवश्यक असलेल्या या घटकांचा पुरवठा जवसापासून होतो, कारण शरीर त्यांना स्वतः तयार करत नाही.

flax seeds | Sakal

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

जवसामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे ते पोट खूप वेळ भरलेले ठेवतात. यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.

flax seeds | Sakal

पचन प्रणालीला मदत

जवसाचा वापर पचनक्रिया सुधारण्यात आणि बद्धकोष्ठता टाळण्यात फायदेशीर ठरतो. मात्र, जवस योग्य प्रमाणातच खाणे गरजेचे आहे.

flax seeds | sakal

त्वचा आणि केसांसाठी उत्तम

जवसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवानी आणि तरुण ठेवतात. तसेच, जवसाच्या तेलामुळे केसांना पोषण मिळते आणि ते लांब आणि मजबूत होतात.

flax seeds | Sakal

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त

जवस हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकार टाळतो.

flax seeds | Sakal

जवसाचे योग्य प्रमाण वापरणे

जवसाचा अति वापर पोटात दुखणे, उलट्या, आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण करू शकतो. त्यासाठी, योग्य प्रमाणातच जवस खाणे आवश्यक आहे.

flax seeds | Sakal

पाणी सोबत जवस घेणे

जवस खाल्ल्यावर पाणी पर्याप्त प्रमाणात घेतल्यासच पचन क्रिया सुरळीत होतात. त्याअर्थी, जवसाचे सेवन करताना पाणी अधिक घेतल्यास फायदेशीर ठरते.

flax seeds | Sakal

गर्भवती महिलांसाठी सावधगिरी

जवस हे अॅस्ट्रोजनसारखे कार्य करतात, त्यामुळे गर्भवती महिलांनी जवस खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

flax seeds | Sakal

जवस कसा खावा?

जवसाच्या बिया अख्या खाण्यापेक्षा, जवसाची पूड अधिक फायदेशीर आहे. एक चहाचा चमचा जवसाची पूड रोज पुरेशी असते.

flax seeds | Sakal

आहारात जवस समाविष्ट करा

जवसाचे सेवन पराठ्यांमध्ये, स्मूदीमध्ये किंवा सॅलेडमध्ये करता येते. यामुळे जवसाचे सेवन चवदार आणि फायदेशीर होऊ शकते.

flax seeds | sakal

किडनी राहील हेल्दी फक्त 'या' सोप्या टिप्स फॉलो करा अन् निरोगी रहा!

sakal | Simple Tips for Kidney Health
येथे क्लिक करा