फ्लोरा फाऊंटन गोळीबाराचा थरार! त्या रक्तरंजित लढ्याने कशी घडवली मुंबईसह महाराष्ट्राची अस्मिता?

Vinayan

फ्लोरा फाऊंटनवर नेमके काय घडले होते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी पेटलेल्या लढ्यात २१ नोव्हेंबरचा दिवस रक्तरंजित ठरला. फ्लोरा फाऊंटन परिसरातील त्या थरारक घटनेमागील सत्य जाणून घेऊया.

Hutatma Chowk History

|

Sakal

मुंबईसाठी पेटलेला असंतोष

राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींनंतर महाराष्ट्राला मुंबई न देण्याच्या भूमिकेमुळे जनतेत तीव्र संताप उसळला. 'मुंबईसह महाराष्ट्र हवाच' या निर्धाराने सर्वसामान्य माणूस रस्त्यावर आला.

Hutatma Chowk History

|

Sakal

संचारबंदी झुगारून विराट मोर्चा

फोर्ट भागात संचारबंदी लागू असतानाही २१ नोव्हेंबर रोजी फ्लोरा फाऊंटन परिसरात मोठा मोर्चा धडकला. हक्काच्या मागणीसाठी सत्याग्रहींचा निर्धार अढळ होता.

Hutatma Chowk History

|

Sakal

लाठीमार आणि गोळीबाराचा थरार

आंदोलकांचा रेटा वाढल्यानंतर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आणि त्यानंतर गोळीबाराचा थरार घडला. निशस्त्र जनतेवर गोळ्या झाडल्या गेल्याने संपूर्ण मुंबई हादरून गेली.

Hutatma Chowk History

|

Sakal

बलिदानाची मोजता न येणारी किंमत

या आंदोलनाच्या लढ्यात विविध टप्प्यांवर १०७ हुतात्म्यांनी प्राण गमावल्याचा इतिहास सांगितला जातो. त्यांच्या बलिदानाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवे बळ दिले.

Hutatma Chowk History

|

Sakal

फ्लोरा फाऊंटन ते हुतात्मा चौक

ज्या ठिकाणी हुतात्म्यांनी रक्ताचा अभिषेक केला, त्या परिसराचे नाव पुढे 'हुतात्मा चौक' झाले आणि १९६५ मध्ये तिथे हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

Hutatma Chowk History

|

Sakal

१ मे १९६० : स्वप्नपूर्तीची पहाट

हुतात्म्यांच्या त्यागाचे चीज करत १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. बलिदानातून मराठी अस्मितेचा नवा अध्याय सुरू झाला.

Hutatma Chowk History

|

Sakal

विस्मृतीत न जाणारा बलिदान इतिहास

हुतात्म्यांचे हे बलिदान विसरता येणार नाही; २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. हा थरारक इतिहास इतरांपर्यंत नक्की शेअर करा!

Hutatma Chowk History

|

Sakal

"२१ नोव्हेंबर हुतात्मा स्मृती दिन: मुंबईसह महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांचे बलिदान! जाणून घ्या अंगावर काटा आणणारा इतिहास"

HutatmaSmrutiDin

|

Sakal

आपला इतिहास जाणून घ्या!