सावलीत वाढणारी सुंदर फुलझाडे कोणती?

Pranali Kodre

सावलीत वाढणारी झाडं

सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात किंवा अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशातही काही फुलझाडं फुलतात.

Flowering Plants That Grow Well in Shade

|

Sakal

पीस लिली

पीस लिली घरात किंवा बाल्कनीतही ठेवता येते. हे झाड सावलीत छान वाढते. त्याला सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं येतात. हे एअर-प्युरिफायर म्हणूनही ओळखले जाते.

Peace Lily

|

Sakal

अँथुरियम (Anthurium)

अँथुरियमला थेट ऊन चालत नाही, त्याला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश आवडतो. त्यामुळे त्याला लाल, गुलाबी किंवा पांढऱ्या फुलं येतात.

Anthurium

|

Sakal

बेगोनिया (Begonia)

बेगोनियाची पाने आणि फुले दोन्ही दिसायला सूंदर असून हे झाड कुंडीत किंवा टोपल्यांमध्येत लावण्यासाठी उत्तम आहे. लाल, गुलाबी, नारंगी आणि पांढऱ्या रंगांत याची फुलं मिळतात.

Begonia

|

Sakal

लेडीज इअररिंग (Fuchsia)

फ्युशियाच्या फुलांचा आकार कानातल्या डुलसारखा असतो, त्यामुळे त्याला लेडीज इअररिंग असंही म्हणतात. या झाडालाही फार ऊन्हाची गरज नसते. ते थंड हवेत किंवा सावलीतही छान फुलते.

Fuchsia

|

Sakal

हायड्रेंजिया (Hydrangea)

हायड्रेंजियाच्या झाडाला मोठ्या गुच्छांच्या स्वरूपात निळी, गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची फुलं येतात. सकाळी थोडं कोवळ ऊन पडेल आणि नंतर सावली असेल, अशा ठिकाणी हे झाड छान फुलते.

Hydrangea

|

Sakal

इम्पेशन्स / बिझी लिझी (Impatiens / Busy Lizzie)

इम्पेशन्स हे झाड सतत फुलण्यासाठी प्रसिद्ध असून याला गुलाबी, लाल, जांभळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांची फुलं येतात. या झाडाला थेट सूर्यप्रकाश आवडत नाही. तसेच थोडी दमट माती आवडते.

Busy Lizzie

|

Sakal

ऑर्किड (Orchids)

ऑर्किडची फुले अतिशय सुंदर, आकर्षक आणि मुख्य म्हणजे अनेक आठवडे किंवा महिने टिकून राहतो.

Orchids

|

Sakal

क्लिव्हिया (Clivia)

क्लिव्हिया हे झाड पूर्णपणे सावलीत वाढणारे आहे. नारंगी किंवा पिवळ्या रंगाच्या फुलांचा मोठा गुच्छ दिसाया आकर्षक वाटतो.

Clivia

|

Sakal

मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येण्यासाठी काय करावे?

How to Get More Chillies on Chilli Plant

|

Sakal

येथे क्लिक करा