Pranali Kodre
मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येण्यासाठी झाडाला योग्य पालन-पोषणाची गरज असते.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
जर झाडाची वाढ होत नसेल किंवा फुलं गळून पडत असतील, तर काही उपाय करता येऊ शकतात.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
१ ते १.५ फूट उंच झाड झाल्यावर त्याच्या मुख्य शेंड्याचा ३-४ इंच भाग कापा, ज्यामुळे झाडाला अनेक नव्या फांद्या फुटतील आणि अधिक मिरच्या लागतील.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
मिरचीच्या झाडाला पोटॅशियम आणि कॅल्शियमची खूप गरज असते. त्यामुळे वापरलेली चहापत्ती सुकवून आणि केळीच्या वाळलेल्या सालींची पावडर १५ दिवसातून एकदा मुळांजवळ टाकल्याने मातीतील पोटॅशियम वाढते.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
महिन्यातून एकदा २ मूठ वर्मीकंपोस्ट किंवा जुने शेणखत मातीत मिसळ्याचाही फायदा होतो.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
आंबट ताक पाण्यात मिसळून आठवड्यातून एकदा झाडावर आणि मुळाशी फरवल्याने फुलगळ थांबते आणि कीड नियंत्रितही होते. त्यामुळे अधिक फुलं लागून मिरच्या येण्याचं प्रमाण वाढतं.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
मिरचीच्या रोपाला ५-६ तास सूर्यप्रकाशाची गरज असते. सावलीत ठेवल्यास झाडाला मिरच्या लागत नाहीत. त्यामुळे योग्य सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी झाड ठेवा.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
मिरचीला अतिपाणी दिलं, तर फुलं गळतात. त्यामुळे माती वरून कोरडी दिसली, तरच पाणी द्या, तसेच मातीत खूप पाणी साचू देऊ नका. त्यामुळे झाडाची मुळं खराब होतात.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
बऱ्याचदा मिरचीच्या झाडावर कीड पडते. त्यामुळे कडूलिंबाच्या तेलाची (१ लिटर पाण्यात १ चमचा कडुलिंबाचं तेल आणि २ थेंब लिक्विड सोप) १० दिवसातून एकदा फावरणी करा.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
५० ग्रॅम हिंग थोड्या पाण्यात मिसळून आंबट ताकात टाका आणि त्याची फरवारणी करा, यामुळेही कीड नियंत्रणात राहाते.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
जर झाडाला फुलं येत असतील पण ती गळून पडत असतील, तर फुलांवर हलक्या हाताने टॅप करा किंवा लहान ब्रश हलका फिरवा, त्यामुळे परागीभवन (Pollination) होऊन मिरच्यांचे प्रमाण वाढू शकते.
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal
Why Aloe Vera Leaves Turn Yellow?
Sakal