लाल की फ्लाय ॲश ? घर बांधताना कोणती वीट निवडावी?

Yashwant Kshirsagar

लोकसंख्या वाढ आणि घरबांधणी

देशाची लोकसंख्या वाढत असताना शहरी तसेच ग्रामीण भागातही पक्की घरे बांधली जात आहेत. सिमेंट, विटा, वाळू आणि लोखंडी सळ्यांचा वापर आता सर्वत्र वाढला आहे.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

विटांचे विविध प्रकार

बाजारात लाल विटा सर्वाधिक वापरल्या जातात. शहरी भागात सिमेंट आणि फ्लाय ॲश (औद्योगिक राख) पासून बनवलेल्या विटाही उपलब्ध आहेत.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

गोंधळ का होतो?

प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे दावे ऐकून सामान्य लोक गोंधळतात. कोणती वीट स्वस्त आणि टिकाऊ आहे, हे समजणे कठीण होते.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

तज्ज्ञांचा सल्ला

बांधकाम कंत्राटदार बैजू कुमार यांच्या मते, लाल विटा आणि फ्लाय ॲश विटा या दोन्हींचे आपापल्या ठिकाणी योग्य उपयोग आहेत.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

खर्चाचा मुख्य मुद्दा

घर बांधताना खर्च कमी आणि दर्जा उत्तम असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. योग्य विटांची निवड केल्यास एकूण खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

फ्लाय ॲश विटांचा खर्च

१,००० चौरस फुटांच्या घरासाठी फ्लाय ॲश विटांचे मॅसोनरी वर्क साधारण ५ ते ५.३ लाख रुपयांपर्यंत पूर्ण होऊ शकते.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

लाल विटांचा खर्च

लाल विटांचा आकार लहान असल्याने वेळ जास्त लागतो, सिमेंट आणि प्लास्टर जास्त लागते. त्यामुळे सुमारे सिमेंट-मजुरी वगळून ५.५ लाख रुपये अतिरिक्त खर्च येऊ शकतो.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

फ्लाय ॲश विटांचे फायदे

आकार मोठा असल्याने बांधकाम वेगाने होते. प्लास्टरसाठी कमी साहित्य लागते, पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि मजुरी कमी होते.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

लाल विटांचे फायदे

सर्वत्र सहज उपलब्ध, मजबूत आणि टिकाऊ. तुटल्या तरी इतर ठिकाणी वापरता येतात. गवंडी त्यांना प्राधान्य देतात.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

योग्य निवड कशी करावी?

खर्च कमी करायचा असेल तर फ्लाय ॲश विटा फायदेशीर ठरू शकतात. मात्र गुणवत्तेची काळजी घ्या. टिकाऊपणा आणि उपलब्धतेसाठी लाल विटाही चांगल्या आहेत. गरजेनुसार निवड करा.

Fly Ash Bricks vs Red Bricks

|

esakal

वर्षातून फक्त एकदाच पाणी पितो 'हा' पक्षी, अफ्रिकेतून भारतात येतो अन्...

Jacobin Cuckoo

|

esakal

येथे क्लिक करा