सकाळ डिजिटल टीम
माशांचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील पण तुम्ही उडणारे मासे पाहिले आहेत का? जाणून घ्या कुठे अढळतात हे मासे.
flying fish
sakal
या माशांचे वैज्ञानिक नाव 'एक्झोसिटिडी' (Exocoetidae) असे आहे. जगभरात याच्या सुमारे ६० ते ७० प्रजाती आढळतात.
flying fish
sakal
त्यांच्या छातीजवळील परांचा (Pectoral fins) आकार खूप मोठा असतो, जे पक्ष्यांच्या पंखांसारखे दिसतात. यामुळेच त्यांना मराठीत 'पाखरू मासा' असेही म्हणतात.
flying fish
sakal
हे मासे पाण्यातून बाहेर पडण्यापूर्वी ताशी ६० किमी पर्यंतचा वेग प्राप्त करू शकतात.
flying fish
sakal
पाण्याबाहेर झेप घेण्यासाठी ते आपली शेपटी अतिशय वेगाने (सेकंदाला ७० वेळा) हलवून स्वतःला वर ढकलतात.
flying fish
sakal
एकदा झेप घेतल्यावर हे मासे हवेत ५० ते २०० मीटर पर्यंतचे अंतर सहजरित्या कापू शकतात. काही विशेष परिस्थितीत हे अंतर ४०० मीटरपर्यंतही असू शकते.
flying fish
sakal
हे मासे समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारण १.२ मीटर (४ फूट) ते ६ मीटर पर्यंत उंच उडू शकतात.
flying fish
sakal
हे मासे केवळ मजेसाठी उडत नाहीत. ट्युना, शार्क किंवा डॉल्फिन यांसारख्या मोठ्या शिकारी माशांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते हवेत उडी मारतात.
flying fish
sakal
हे मासे प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील (Tropical) समुद्रांमध्ये आढळतात. महाराष्ट्रात कोकण आणि पालघरच्या किनारपट्टीवर मच्छिमारांना हे मासे अनेकदा दिसतात.
flying fish
sakal
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal