सूरज यादव
बिबटे चपळ शिकारी आहेत. त्यांचा जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
दक्षिण अफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्थानातील बिबट्यांचे वजन ९० किलोपर्यंत असते, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्यांचे वजन २० किलोपर्यंत असते. ही वैविध्यता भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असल्याचे मानले जाते.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
बिबट्यांच्या ठिपक्यांमध्ये, पिवळ्या त्वचेमधे प्रदेशानुसार छटा असतात. पर्जन्यवनातील बिबट्यांची त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी असते. वाळवंटी भागातील बिबट्यांची त्वचा काहीशी फिकट असते; थंड प्रदेशांमध्ये थोडी करडी असते.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते. प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
बिबटे माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीही खातात.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठे सांबर किंवा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो. अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे हे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
रशियामध्ये ते सायबेरियाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात. आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची शिकार करतात.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
बिबट्याची चावण्याची क्षमताही सिंह व वाघ यांच्यापेक्षा जास्त असते. एखाद्या तगड्या जवान बिबट्याची चावण्याची क्षमता ही १५०० पीएसआय इतकी असते.
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal
Final And Finale Difference
ESakal