बाहेर दिसतंय ते धुकं की विषारी धुरके? समजून घ्या !

Vinayan

बाहेर दिसतंय ते धुकं की विषारी धुरके?

हिवाळ्यात सकाळी बाहेर पडताना वातावरणात दिसणारी पांढरी चादर हे केवळ गुलाबी थंडीचे नैसर्गिक धुके (Fog) आहे की आरोग्याला हानी पोहोचवणारे धुरके (Smog), हे जाणून घेणे प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचे आहे.

Fog vs Smog

|

sakal

'धुके' (Fog) ही नैसर्गिक प्रक्रिया!

हवेतील तापमान कमी झाल्यावर पाण्याच्या बाष्पाचे सूक्ष्म थेंब हवेत तरंगू लागतात, त्याला आपण 'धुके' म्हणतो. ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी यामुळे दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होऊन वाहतुकीवर मोठा परिणाम होतो.

Fog vs Smog

|

Sakal

'स्मॉग' (Smog) म्हणजे काय?

वाहनांचा धूर, बांधकामाची धूळ, कचरा जाळणे आणि कारखान्यांमधील रासायनिक वायू जेव्हा हवेतील बाष्पामध्ये मिसळतात, तेव्हा विषारी 'स्मॉग' तयार होतो.

Fog vs Smog

|

Sakal

केवळ रंगावरून फरक ओळखता येतो का?

पांढरे म्हणजे धुके आणि पिवळसर म्हणजे स्मॉग, हा गैरसमज आहे. स्मॉगचा खरा धोका रंगावरून नव्हे, तर तुमच्या परिसरातील AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक) आणि PM2.5 पातळीवरून स्पष्ट होतो.

Fog vs Smog

|

Sakal

शरीरावर होणारे तात्काळ परिणाम!

स्मॉगमध्ये गेल्यावर प्रत्येकाला लगेच त्रास होतोच असे नाही. प्रदूषणाची तीव्रता आणि व्यक्तीच्या संवेदनशीलतेनुसार खोकला, डोळे चुरचुरणे किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

Fog vs Smog

|

Sakal

'टेम्परेचर इन्व्हर्जन'मुळे प्रदूषण जमिनीलगत अडकते!

हिवाळ्यात वातावरणात उलट्या क्रमाने बदलणाऱ्या तापमानामुळे (Temperature Inversion) थंड हवेचा थर जमिनीलगत स्थिर राहतो; परिणामी वाहने, उद्योग व विविध स्रोतांचे प्रदूषण वर न जाता जमिनीजवळच अडकून राहते.

Fog vs Smog

|

Sakal

कोणासाठी आहे सर्वाधिक धोका?

स्मॉगमधील अतिसूक्ष्म विषारी कण (PM2.5) थेट फुफ्फुसात जातात. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना बसतो.

Fog vs Smog

|

Sakal

N95 मास्क कितपत प्रभावी ठरतो?

बाहेर पडताना N95 मास्क हवेतील अतिसूक्ष्म कणांपासून (PM2.5 आणि PM10) प्रभावी संरक्षण देतो; मात्र नायट्रोजन ऑक्साईड किंवा ओझोनसारख्या विषारी वायुरूप प्रदूषकांपासून (Gaseous Pollutants) तो पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही.

Fog vs Smog

|

Sakal

स्वतःचा बचाव कसा कराल?

सकाळी AQI धोकादायक पातळीवर असताना घराबाहेर तीव्र व्यायाम टाळा. कोमट पाण्याने किंवा वाफेने घशाला तात्पुरता आराम मिळतो; मात्र प्रदूषणापासून खरा बचाव हा संपर्क कमी ठेवणे आणि घराची हवा सुरक्षित ठेवण्यातच आहे.

Fog vs Smog

|

Sakal

रहस्यमयी 'जुळ्यांचे गाव'! जिथे प्रत्येक घरात दिसतात हुबेहूब बेहरे; वैज्ञानिकही झालेत अचंबित

kodinhi twin village mystery

|

Sakal

जाणून घ्या !