सकाळ डिजिटल टीम
गोठा हवेशीर ठेवा, भरपूर मोकळी हवा येण्यासाठी कुलर, पंखे लावावे.
संख्येवर नियंत्रण, गोठ्यात मर्यादित संख्येत जनावरे बांधावी.
उन्हापासून संरक्षण, जनावरांना जास्त वेळ उन्हात बांधू नये, झाडाच्या सावलीत ठेवावे.
गोठ्याचे छत थंड ठेवा,छतावर गवताचे किंवा परहाटीचे भारे टाकून पाण्याचा फवारा मारावा.
अंगावर झुल बांधा, जनावरांच्या अंगावर कापडाची झुल बांधल्यास उष्णता कमी होईल.
थंड वातावरण तयार करा, गोठ्याच्या भोवती ओले पोते लावावेत.
आहार व्यवस्थापन, हिरवा चारा भरपूर द्यावा, कोरडा चारा कमी द्यावा.
स्वच्छ पाणी द्या: जनावरांना थंड, स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
सर्व जनावरांची काळजी घ्या, गाई, म्हशी, बैल, कोंबड्या आणि बकऱ्यांना उन्हाळ्यात विशेष काळजी आवश्यक!