केसांमधील गुंता सोडवण्यासाठी सोप्या टिप्स करा फॉलो

Monika Lonkar –Kumbhar

लांब केस

आपले केस लांब आणि घनदाट असावेत, असे अनेक महिलांना वाटते.

परंतु, या लांब केसांची काळजी घेणे हे वाटते तितके सोपे नाही.

गुंता

लांब केसांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंता होतो. हा गुंता कसा काढायचा? असा प्रश्न महिलांना पडतो. त्यासाठीच्या टिप्स जाणून घेऊयात.

कंडिशनर

लांब केसांना शॅंम्पू केल्यानंतर, केसांना कंडिशनर लावायला विसरू नका.

केसांना कंडिशनर लावल्यामुळे केस मुलायम होतात आणि केसांमध्ये गुंता होत नाही.

कंगवा

केसांना पातळ दातांचा कंगवा वापरण्याऐवजी जाड दातांचा कंगवा वापरा. यामुळे, केसांमधील गुंता सहजपणे निघण्यास मदत होते.

हेअर सीरम

केसांमध्ये झालेला गुंता कमी करण्यासाठी हेअर सीरम अतिशय फायदेशीर ठरते.

परी म्हणू की सुंदरा..! माधुरीचा मनमोहक अंदाज

Madhuri Dixit | esakal