Anushka Tapshalkar
नवीन वर्षात आपल्या आरोग्याची काळजी घेणे हा सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. त्यासाठी काही जीवनशैलीतील बदलही गरजेचे आहेत. तुम्ही जर पुढील सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हालाही त्याचे परिणाम नक्की दिसतील.
वजन कमी करण्यासाठी पोषक आहार आणि चांगल्या व्यायामाच्या सवयींचे पालन करायला तुम्ही खरंच तयार आहात का याची खात्री करा.
स्वतःसाठी ठराविक आणि वैयक्तिक ध्येय ठरवा, तसेच योग्य सल्ल्यासाठी प्रेरणादायी व्यक्तींशी संपर्क साधा, यामुळे तुमच्यात आत्मप्रेरणा निर्माण होईल.
आठवड्यातून तीन दिवस तरी व्यायाम करण्याचे वास्तविक उद्दिष्ट सेट करा. त्यामध्ये तुम्ही करणाऱ्या कृती आणि त्याचे परिणाम दोन्ही नमूद करा.
फायबर युक्त फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्य तसेच पोषकमूल्य असलेल्या अन्नाचा समावेश तुमच्या आहारात करा.
नियमित शारीरिक हालचाली, जसे की चालणे, योगा, जिम, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग यांमुळे कॅलोरीज बर्न होतात आणि आरोग वाढण्यास मदत होते.
वजन कमी करणे किंवा चरबी घटवणे, तुमची जीवनशैली बनवा. हे करत असताना तुमच्या वाईट सवयींना आळा घालण्याचा प्रयत्न करा.
चिरस्थायी परिणाम मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम अत्यावश्यक आहेत, म्हणून दीर्घकालीन आणि आरोग्यदायी जीवनशैलीत सकारात्मक बदल स्वीकारा.