Aarti Badade
वाढत्या उष्णतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात आणि त्यामध्ये 'साल्मोनेला' किंवा 'ई-कोलाय' सारख्या हानिकारक विषाणूंची वाढ होते. परिणाम होऊन फूड पॉयझनिंगचा त्रास सुरू होतो.
Food poisoning home remedies
Sakal
फूड पॉयझनिंग झाल्यानंतर वारंवार उलट्या आणि जुलाब होतात. यामुळे शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे क्षार झपाट्याने कमी होतात, ज्यामुळे प्रचंड थकवा, अशक्तपणा आणि रक्तदाब कमी होण्याचा धोका निर्माण होतो.
Food poisoning home remedies
Sakal
उन्हाळ्यातील ओलावा जिवाणूंना आकर्षित करतो. उघड्यावरील कापलेली फळे, दूषित पाणी, बर्फाचे गोळे किंवा सरबत प्यायल्यामुळे टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
Food poisoning home remedies
Sakal
उलट्या-जुलाबावाटे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे दिवसातून किमान ४ ते ६ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी सतत पित राहिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
Food poisoning home remedies
Sakal
नारळ पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक असते, जे शरीरातील क्षारांची पातळी संतुलित करते. जुलाब होत असल्यास 'ओआरएस' (ORS) युक्त पाणी पिणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.
Food poisoning home remedies
Sakal
दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यावे. ताकामध्ये असलेले 'प्रोबायोटिक्स' आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची पातळी वाढवतात, ज्यामुळे बिघडलेली पचनसंस्था पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते.
Food poisoning home remedies
Sakal
उन्हाळ्यात जास्त तिखट, तेलकट आणि बाहेरचे अन्न टाळावे. नारळ पाणी किंवा कापलेली फळे जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका, कारण त्यामध्ये काही तासांतच विषारी घटक तयार होऊ शकतात.
Food poisoning home remedies
Sakal
Weight gain reasons
Sakal