Aarti Badade
अंजीर, खजूर, काळे मनुके यांसारखे सुकामेवे तुपात भिजवून खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये प्रचलित आहे. मात्र, त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.
अंजीरमध्ये फायबर आणि काही महत्त्वाची खनिजे असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
foods soaked ghee health
Sakal
खजुरामध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम असते. तुपासोबत खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते; मात्र खजूर हिमोग्लोबिन वाढवण्याचा खात्रीशीर उपाय नाही.
Dates soaked in ghee benefits
sakal
काळ्या मनुकांमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्यांचे मर्यादित सेवन पचनासाठी उपयुक्त ठरू शकते.
Soaked Raisins
Sakal
लसणामध्ये अँटिऑक्सिडंट आणि सल्फरयुक्त घटक असतात. तो तुपात हलका परतून खाता येतो; मात्र यामुळे हृदयरोग किंवा संसर्ग पूर्णपणे टाळता येतो, असा दावा करता येत नाही.
foods soaked ghee health
Sakal
तुपात थोडी हळद आणि चिमूटभर काळी मिरी मिसळून आहारात समाविष्ट करता येते. या घटकांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असले तरी हा मिश्रण सूज किंवा संसर्गावर उपचार नाही.
foods soaked ghee health
Sakal
तूप आणि सुकामेवे यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. तुपात पदार्थ २ ते ३ दिवस भिजवून ठेवण्याऐवजी स्वच्छ पद्धतीने ताजे मिश्रण तयार करा आणि मधुमेह, वजन किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
foods soaked ghee health
Sakal
Old Name of China
Sakal