Aarti Badade
किडनी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, रक्त शुद्ध करते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतो. चुकीचा आहार किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरू शकतात.
Kidney damage foods
Sakal
बाहेरून विकत आणलेले चिप्स, बिस्किटे किंवा मसालेदार पॅकिंग फूड खाणे टाळा. या पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, जे किडनीवर थेट ताण निर्माण करते.
Kidney damage foods
Sakal
सॉसेज, हॉट डॉग आणि फ्राइड चिकन यांसारखे प्रक्रिया केलेले मांस किडनीसाठी अत्यंत घातक मानले जाते. यातील प्रिझर्व्हेटिव्ह्ज किडनीच्या कार्याला अडथळा आणतात.
Kidney damage foods
Sakal
ज्यांना आधीच किडनीचा काही त्रास आहे, अशा व्यक्तींनी दूध, दही आणि चीज यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच यांचे प्रमाण निश्चित करावे.
Kidney damage foods
Sakal
संत्री आरोग्यासाठी चांगली असली, तरी किडनी रुग्णांसाठी ती त्रासदायक ठरू शकतात. शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढून किडनीला इजा होऊ शकते.
Kidney damage foods
sakal
पेयांमध्ये किंवा पदार्थांमध्ये कृत्रिम साखर अधिक असते, ते पदार्थ किडनी फेल होण्यास कारणीभूत ठरू शकतात. सोडा आणि कोल्ड्रिंक्सपासून लांब राहणेच हिताचे आहे.
Kidney damage foods
Sakal
किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि वरील पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा. कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Kidney damage foods
Sakal
Heart attack symptoms
Sakal