तरुणांनो सावध! 1 महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे!

Aarti Badade

शरीराचे धोक्याचे संकेत

प्रौढच नाही, तर तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणामुळे हृदयविकार बळावतात.

Heart attack symptoms

|

Sakal

१ महिना आधीच दिसतात लक्षणे

हार्ट अटॅक अचानक येतो असा अनेकांचा समज असतो, पण त्याचे संकेत शरीरात साधारण एक महिना आधीच दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखली तर मोठा धोका टाळता येतो.

Heart attack symptoms

|

Sakal

सततचा थकवा आणि श्वास घेण्यास त्रास

विनाकारण प्रचंड थकवा जाणवणे किंवा थोड्या श्रमानंतरही श्वास घ्यायला त्रास होणे हे हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. याकडे 'सामान्य थकवा' म्हणून दुर्लक्ष करू नका.

Heart attack symptoms

|

Sakal

शरीरात ऑक्सिजनची कमतरता

जेव्हा हृदयाकडून रक्ताचे अभिसरण व्यवस्थित होत नाही, तेव्हा शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे शरीर सुस्त पडू लागते आणि सतत अस्वस्थ वाटते.

Heart attack symptoms

|

Sakal

चक्कर येणे आणि धाप लागणे

रक्तप्रवाह मंदावल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा बसल्या जागी धाप लागणे अशी लक्षणे दिसू लागतात.

Heart attack symptoms

|

Sakal

हृदयाचे ठोके आणि छातीत अस्वस्थता

हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा छातीत जडपणा जाणवणे हे हार्ट अटॅकचे मोठे लक्षण आहे. यासोबतच हाताला किंवा जबड्याला मुंग्या येणे हे देखील गंभीर संकेत आहेत.

Heart attack symptoms

|

Sakal

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण वारंवार जाणवत असेल, तर घरगुती उपाय करण्यापेक्षा ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत केलेली तपासणी तुमचे प्राण वाचवू शकते.

Heart attack symptoms

|

Sakal

BP ठीक पण हृदय धोक्यात? हार्ट ब्लॉकेज ओळखण्यासाठी ‘या’ चाचण्या गरजेच्या

Heart blockage risk normal BP Crucial Tests

|

Sakal

येथे क्लिक करा