Lung Health Foods : श्वास घ्यायला त्रास होतोय? फुफ्फुस निरोगी ठेवायचंय? मग, 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश!

सकाळ डिजिटल टीम

फुफ्फुसं बनवा लोखंडासारखी!

फुफ्फुसे म्हणजेच आपले श्वसन अवयव, हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचं यंत्र आहे. ती ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला आवश्यक असा प्राणवायू मिळतो.

Lung Health Foods | esakal

आधुनिक जीवनशैलीचा फुफ्फुसांना धोका

सध्याची व्यस्त आणि असंतुलित जीवनशैली, प्रदूषित वातावरण, चुकीचे खाणे आणि व्यायामाचा अभाव या सगळ्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांचं संरक्षण आणि पोषण आवश्यक ठरतंय.

Lung Health Foods | esakal

फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा :

आले

आले हे फुफ्फुसांसाठी अमृततुल्य आहे. यामध्ये व्हिटॅमिन C, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅंगनीज आणि तांबे असतात. हे घटक फुफ्फुसांच्या पेशींना मजबुती देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Lung Health Foods | esakal

ब्लूबेरी

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीजमध्ये अँथोसायनिन्स, फ्लेव्होनॉइड्स, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स आढळतात. या पोषक घटकांमुळे फुफ्फुसांच्या पेशींना संरक्षण मिळतं आणि ते कार्यक्षम राहतात.

Lung Health Foods | esakal

ग्रीन टी

ग्रीन टी फक्त वजन कमी करत नाही, तर ती शरीरात असलेले विषारी घटक बाहेर काढते. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे फुफ्फुसांवरील ताण कमी होतो आणि ते ताजेतवाने राहतात.

Lung Health Foods | esakal

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचं प्रभावी घटक असतं. हे शरीरात दाह कमी करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारतं. हळदीमुळे फुफ्फुसांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते.

Lung Health Foods | esakal

या गोष्टी मर्यादित प्रमाणातच खा

वरील गोष्टी फुफ्फुसांसाठी फायदेशीर असल्या तरी त्याचे अति सेवन टाळावे. अति प्रमाणात खाल्ल्यास पचन बिघडू शकते किंवा अन्य त्रास होऊ शकतात. संतुलन राखणे हेच आरोग्याचं गमक आहे.

Lung Health Foods | esakal

उलटीमध्ये रक्त दिसतंय? वजन झपाट्यानं कमी होतंय? थकल्यासारखं वाटतंय? ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरची असू शकतात! वेळीच सावध व्हा

Stomach Cancer Symptoms | esakal
येथे क्लिक करा...