Saisimran Ghashi
रात्रीच्या जेवणात काही विशिष्ट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचन होण्याची शक्यता वाढते.
समोसे, भजी, पुरी, पकोडे यांसारखे पदार्थ रात्री खाल्ल्यास पचनावर ताण येतो आणि अपचन होऊ शकते.
मसाल्याने भरलेले किंवा अति तिखट पदार्थ जसे की बिर्याणी, गरम करी हे रात्री घेतल्यास अॅसिडिटी व गॅस होण्याचा धोका वाढतो.
नूडल्स, बिस्किट्स, पिझ्झा, पॅकेज्ड स्नॅक्स यामध्ये संरक्षक व कृत्रिम घटक असतात, जे पचनासाठी अपायकारक ठरू शकतात.
कोणताही पदार्थ अगदी भरपेट खाल्ल्यास पचनासाठी जड पडतो, विशेषतः रात्री शरीराची कार्यक्षमता मंदावलेली असते.
रात्री झोपण्याच्या अगोदर दही, चीज किंवा भरपूर दूध घेतल्यास काही जणांना अपचन, गॅसेस किंवा पोट फुगण्याची तक्रार होते.
रात्री हलके व पचायला सोपे अन्न खाणे आणि झोपण्यापूर्वी किमान २ तास आधी जेवणे हे अपचन टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.