Anushka Tapshalkar
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे PCOS हा आजार महिलांमध्ये झपाट्याने वाढत असून, हार्मोनल बिघाड, अनियमित पाळी, वाढतं वजन आणि त्वचेचे विविध त्रास यासारखी लक्षणं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
PCOS/PCOD फक्त कॅलरीजवरच नाही तर हार्मोन्सवर देखील अवलंबून असते. त्यामुळे हे आपले हार्मोन्स अन्नाला कसे प्रतिसाद देतात यावर अवलंबून असते.
तुम्हालाही PCOS/PCOD मुळे वजन कमी करणे कठीण जात आहे? पुढील पदार्थ आहारातून काढून टाकले तर वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होईल.
पुढे असे अन्नपदार्थ दिले आहेत जे PCOS/PCOD नियंत्रणासाठी आहारातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत किंवा त्यांचे मर्यादित सेवन केले पाहिजे.
ब्रेड, पास्ता, भात, केक किंवा पेस्ट्री सारखे रिफाइन्ड कार्ब्स इन्सुलिन वाढवतात. तसेच PCOS/PCOD असलेल्या महिलांपैकी सुमारे ७०% महिलांना इन्सुलिन रेझिस्टन्स असते, त्यामुळे हे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
वेफर्स, बिस्किट्स आणि रेडी टू ईट फूड्स यांसारखे प्रोसेस्ड पदार्थ तुमचं मेटाबोलिझम बिघडवतात आणि गट हेल्थलाही नुकसान पोहोचवतात. परिणामी वजन कमी होत नाही.
PCOS/PCOD असलेल्या काही महिला दूध किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांनी त्रास होऊ शकतो. परिणामी जळजळ होणे आणि टेस्टोस्टेरोन पातळी वाढू शकतात. त्यामुळे दूध, चीज, आइस्क्रीम खाणे टाळावे.
कोल्ड ड्रिंक्स, सोडा, फ्लेवर्ड कॉफी किनगाव पॅकेज्ड ज्यूससारख्या पेयांमध्ये द्रव रूपात असलेली साखर शरीरातील ग्लुकोज लगेच वाढवते. त्यामुळे वजन कमी करणे कठीण होते.
सॉसेज, बेकन, सलामी यांसारखे प्रक्रिया केलेले मांस टाळा, कारण त्यामध्ये असणारे सोडियम, नायट्रेट्स आणि वाईट फॅट्स इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.