Yashwant Kshirsagar
वयानुसार त्वचेवर सुरकुत्या दिसणे सामान्य आहे, पण आजकाल खराब लाईफस्टाईल मुळे लोक वयाआधीच म्हातारे दिसू लागले आहेत.
जर तुम्ही देखील अशा गोष्टींचा सामना करत असाल तर तुम्ही असे काही पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत ज्यामुळे तुमचे एजिंग जास्त होते. असे पदार्थ टाळल्यास तुम्ही दीर्घकाळ सुंदर दिसू शकता.
पोषणाची कमतरता, चुकीच्या आहारशैली, यामुळे त्वचेवर सुरकुत्या, स्किनच लूज पडणे सारखे म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात.
आरोग्यदायी राहण्यासाठी दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी तुम्ही पोषणयुक्त आहार घेतला पाहिजे.
त्वचा जवान राहण्यासाठी तुम्ही गोड पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे, कारण गोड पदार्थांमुळे त्वचेचे एजिंग जास्त होते.
मैद्यापासून तयार केलेले पदार्थ त्वचेसाठी चांगले नसतात त्यामध्ये प्रोसेड कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे सीबएम वाढते, त्यामुळे चेहऱ्यावरील रोम छिद्र बंद होतात आणि मुरुम आणि त्वचेवर सूज येते.
जर तुम्हाला निरोगी आणि तरुण दिसायचे असेल तुम्ही दारु पासून देखील दूर राहिले पाहिजे.
याशिवाय प्रोसेस्ड फूड देखील एजिंग वेगाने वाढवते. त्यामुळे असे अन्न देखील टाळले पाहिजे