बाळकृष्ण मधाळे
चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, काही खाद्यपदार्थ चहासोबत खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खालील गोष्टी चहासोबत खाणे टाळणे गरजेचे आहे.
Foods to Avoid with Tea
esakal
चहासोबत भजी खाणे अनेकांना आवडते. परंतु, तेलकट आणि तळलेले पदार्थ चहासोबत घेतल्यास यकृतावर ताण येऊ शकतो आणि पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
Foods to Avoid with Tea
esakal
मैद्यापासून बनवलेले पांढरे ब्रेड चहासोबत खाणे टाळावे. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीरात अनावश्यक कॅलरी वाढू शकतात.
Foods to Avoid with Tea
esakal
भाजलेले ब्रेड म्हणजे टोस्ट चहासोबत खाल्ल्यास काही वेळा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, विशेषतः जर त्यावर बटर किंवा जास्त मीठ असेल तर.
Foods to Avoid with Tea
esakal
चहा आणि फळे एकत्र खाणे योग्य मानले जात नाही. यामुळे पचनात अडथळा निर्माण होऊन अपचनाचा त्रास होऊ शकतो.
Foods to Avoid with Tea
esakal
चहासोबत खारट पदार्थ खाल्ल्यास पोटात आम्लता (ॲसिडिटी) वाढू शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
Foods to Avoid with Tea
esakal
चहामध्ये बिस्किटे बुडवून खाण्याची सवय अनेकांना असते. पण यामुळे साखरेचे प्रमाण वाढते, वजन वाढू शकते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
Foods to Avoid with Tea
esakal
भाजलेले सुकामेवा चहासोबत खाणे टाळावे. यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो आणि काही आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळू शकते.
Foods to Avoid with Tea
esakal
चहा पिताना योग्य आहाराची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वरील पदार्थ टाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
Foods to Avoid with Tea
esakal
Why Cancer Risk Increases With Age
esakal