किडनीच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? मग, आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

किडनी

किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. 

थोडक्यात आपले संपूर्ण शरीर डिटॉक्सीफाय करण्याचे काम किडनी करते. किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते.

आहार

निरोगी किडनीसाठी नियमितपणे व्यायाम, भरपूर पाणी आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. परंतु, वाढत्या वयानुसार किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

लसूण

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांचे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

रताळी

रताळ्याला स्वीट पोटॅटो असे आवर्जून म्हटले जाते. रताळे आपल्या आरोग्यासोबतच निरोगी किडनीसाठी अतिशय फायदेशीर आहे. 

फ्लॉवर

फ्लॉवरमध्ये विपुल प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे आणि पोटॅशिअमचा समावेश आढळून येतो. हेल्दी किडनीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी फ्लॉवरचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करा.

ब्लूबेरीज

ब्लूबेरीमध्ये असलेले पोषकघटक शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान आणि त्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात. शिवाय, यामुळे, किडनीचे आरोग्य निरोगी राहते.

बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ असलेल्या फळाचे भरपूर फायदे

Jackfruit Benefits | esakal