Gut Health सुधारण्यासाठी दह्यापेक्षा जास्त फायदेशीर असलेले 6 प्रोबायोटिक सुपरफूड्स

Anushka Tapshalkar

आतड्यांचं आरोग्य आणि प्रोबायोटिक्स

आजच्या जीवनशैलीमुळे (अँटिबायोटिक्स, प्रोसेस्ड अन्न) आतड्यांमधील चांगल्या-वाईट जिवाणूंचा समतोल बिघडतो. फक्त दही पुरेसं नसतं—विविध प्रोबायोटिक अन्न गरजेचं आहे.

gut health

|

Sakal

प्रोबायोटिक्स म्हणजे काय?

प्रोबायोटिक्स म्हणजे ‘चांगले जिवंत जिवाणू’ जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात, पचन मजबूत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

केफिर: दह्यापेक्षा जास्त शक्तिशाली

‘पिण्याचं दही’ म्हणून ओळखलं जाणारं केफिर 30 पेक्षा जास्त प्रोबायोटिक स्ट्रेन्स देतं. यामुळे gut bacteria ची विविधता लक्षणीय वाढते.

कांजी, सॉवरक्रॉट आणि किमची

कांजी (जांभळ्या गाजरांची), सॉवरक्रॉट आणि किमची ही आंबवलेली अन्नपदार्थ आतड्यांतील चांगले जिवाणू वाढवतात आणि सूज कमी करतात.

नाटो आणि कोम्बुचा

नाटो (आंबवलेली सोयाबीन) हृदय व हाडांसाठी फायदेशीर, तर कोम्बुचा लिव्हर डिटॉक्स आणि पचन सुधारण्यात मदत करते.

विविध प्रोबायोटिक्स का महत्त्वाचे?

वेगवेगळे प्रोबायोटिक स्ट्रेन्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात आणि शरीरातील दाह (Inflammation) कमी करण्यास मदत करतात.

रोजच्या आहारात कसे घ्याल?

दह्याऐवजी केफिरची ताक, सॅलडमध्ये थोडी किमची/सॉवरक्रॉट, आणि घरची कांजी—लहान प्रमाणात, पण नियमित सेवन करा.

डायबिटीज होण्याआधी त्वचेत दिसतात 'हे' बदल!

Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk

|

sakal

आणखी वाचा