सकाळ डिजिटल टीम
आत्ता पर्यंत तुम्ही दही, ताक या पदार्थांची कढी बनवली असेल.
तुम्ही चिंचेची कढी कधी बनवली आहे का?
झणझणीत चिंचेची कढी बनवण्याची अगदी सोपी पद्धत जाणून घ्या.
चिंच पाण्यात भिजवून ठेवा. 15-20 मिनिटांनी, चिंचेचा गर पाण्यातून काढून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिंग, कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि गरम मसाला (जर वापरत असाल) घालून परतून घ्या.
कांद्याचे मिश्रण आणि चिंचेचा गर एकत्र करा. त्यात मीठ, हळद, आणि लाल तिखट (चवीनुसार) घाला.
मिश्रण चांगले मिक्स करून, मध्यम आचेवर उकळायला ठेवा.
कढी घट्ट होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत उकळवा.
कोथिंबीरने गार्निश करा आणि गरमागरम सर्व्ह करा.