Pranali Kodre
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वात फिट खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने नुकताच ५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याच्या ४० वा वाढदिवस साजरा केला.
दरम्यान, वयाच्या चाळीशीतही रोनाल्डो इतका फिट कसा, त्यासाठी तो काय काय करतो, हे थोडक्यात जाणून घेऊ.
रोनाल्डो आठवड्याच्या ५ दिवस दिवसभरात चार तास तरी ट्रेनिंग करतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यात स्प्रिंट्स, वेटलिफ्टिंग कार्डिओ, पिलेट्स आणि स्विमिंगचा समावेश आहे.
याशिवाय मसल स्ट्रेंथसाठीही तो बेंट प्रेसेस, डेडलिफ्ट, स्क्वाट्स हे व्यायाम देखील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करतो.
त्याच्या ट्रेनिंगमध्ये कार्डिओ देखील महत्त्वाचे आहे, ज्यात धावणे, सायकलिंगचाही समावेश आहे.
त्याचबरोबर आहार देखील रोनाल्डोसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तो दिवसभरात ६ वेळा छोटा-छोटा आहार करतो. साधारण २ ते ४ तासांच्या फराकाने तो हे आहार घेतो.
आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तो प्रोटीन्स ज्यूस, सप्लिमेंट आणि व्हिटामिन यांचं संतुलन राखतो. त्याच्या आहारात हाय प्रोटिन आणि लो फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश आहे. यात अंडी, ब्रेड, फिश, पालेभाज्या, चिकन, सलाड, बटाटा, भात, बीन्स, फळं अशा गोष्टींचा समावेश आहे.
तो स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्यप्रमाणात पाणीही पितो, याशिवाय फळांच्या ज्यूसचाही त्याच्या आहारात समावेश आहे.
रोनाल्डो झोपेलाही तितकेच महत्त्व देतो. तो रात्रीच्या झोपेनंतरही दिवसभरातही ठराविक कालावधीच्या थोडा थोडावेळाने वामकुक्षीही घेतो.
रोनाल्डो साखरजन्य पदार्थ आणि पेय टाळतो, त्याशिवाय तो अल्कोहोलपासूनही दूर राहतो.