Pranali Kodre
अभिषेक शर्मा याने वानखेडे स्टेडियमवर २ फेब्रुवारीला झालेला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा टी२० सामना गाजवला.
त्याने ३७ चेंडूतच शतक ठोकताना ५४ चेंडूत १३५ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी विक्रमी ठरली.
दरम्यान, अष्टपैलू असलेला अभिषेक शर्मा हा भारताचा दिग्गज युवराज सिंगचा शिष्य आहे.
नुकतेच अभिषेकच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलाताना सांगितले की युवराजने त्याला घडवलं आहे. तसेच युवराजने त्याच्यासाठी लॉकडाऊनपासून जी दिनचर्या ठरवून दिली आहे, ती तो अजूनही पाळतो.
अभिषेकच्या वडिलांनी सांगितल्यानुसार अभिषेक पहाटे ४ वाजता उठतो, ध्यान करतो, योग करतो, स्विमिंग आणि जीम करतो. त्यानंतर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव करतो. हे त्याचं गेल्या ४-५ वर्षांपासूनचं रोजचं रुटीन आहे.
याशिवाय त्यांनी सांगितलं की जेव्हा ऑफ सिजन असतो, तेव्हा अभिषेक छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो. तसेच तो त्याच्या खेळाचे व्हिडिओ युवराजला पाठवतो.
अभिषेकच्या वडिलांनी असंही सांगितले की युवराजसोबत अभिषेत रोज रात्री तासभर तरी बोलतो.
अभिषेकच्या शतकानंतर युवराजने त्याचे कौतुकही केले होते.