मित्राने पळवली दिग्गज खेळाडूची बायको पण दूसरा नवऱ्यालाही देतेय गुलीगत धोका

Pranali Kodre

घटस्फोटाबाबत चर्चा

गेल्या काही दिवसात काही खेळाडूंच्या घटस्फोटाबाबत चर्चा होत आहेत. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yuzvendra Chahal | Instagram

धोका

एका खेळाडूला त्याच्याच पत्नीने धोका देऊन त्याच्या संघसकाऱ्याशी अफेअर केले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की काही वर्षांपूर्वी त्या खेळाडूनेही असेच काही केले होते.

Mauro Icardi | Instagram

माऊरो इकार्डी

ही घटना घडली आहे अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मॉरो इकार्डीबाबात आहे. तो आणि त्याची पत्नी वांडा नारा आता घटस्फोट घेत आहेत. त्यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते.

Mauro Icardi | Instagram

आरोप

इकार्डीने नारावर आरोप केले आहेत की तिचे त्याचा माजी संघसहकारी किता बाल्डेसोबत अफेअर आहे. इकार्डी आणि किता इंटर मिलानकडून एकत्र खेळत होते.

Mauro Icardi | Instagram

कितावरही पत्नीचे आरोप

कितावर त्याची एक्स पत्नी सिमोना गुआटिएरीनेही आरोप केले होते. सिमोना आणि किता यांचे २०२२ मध्ये लग्न झाले, परंतु दोन महिन्यातच ते वेगळे झाले.

keita balde | Instagram

घटस्फोट

दरम्यान, नारा आणि इकार्डी यांच्या घटस्फोटाची केस २०१९ पासून कोर्टात सुरू आहे.

wanda nara | Instagram

इकार्डीनेही दिलेला मित्राला धोका

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की इकार्डीनेही त्याचा संघसहकारी आणि मित्र मॅक्सी लोपेजला धोका देऊन नाराशी २०१४ मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुली देखील आहेत.

Mauro Icardi | Instagram

लोपेज आणि इकार्डी

नाराने २००८ मध्ये फुटलॉबपटू मॅक्सी लोपेजशी लग्न केले होते. त्यावेळी लोपेज आणि इकार्डी एकत्र सॅम्पडोरिया संघाकडून फुटबॉल खेळायचे. यादरम्यान त्यांच्यात चांगली मैत्रीही होती.

Maxi Lopez | Instagram

मैत्री तुटली

परंतु, याचदरम्यान नारा आणि इकार्डी यांच्यात अफेअर सुरू झाल्याने लोपेजने नारासोबत घटस्फोट घेतला. इतकेच नाही, तर लोपेज आणि इकार्डी यांच्यातील मैत्रीही तुटली.

Mauro Icardi | Instagram

करावे तसे भरावे

आता यानंतर पुन्हा एकदा इकार्डीच्या बाबतीत तसेच घडताना दिसले आहे.

Mauro Icardi | Instagram

रिंकू सिंगची होणारी बायको कोण? पाहा Photo

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal
येथे क्लिक करा